कुठलाही समाज मागे नाही याचे श्रेय कॉंग्रेसचे – आमदार बसवराज पाटील

औसा : निवडणूक काळात चर्चा झाली पाहिजे, विचारांची देवाणघेवाण झाली तरच लोकांचे प्रश्न समजतील आणि त्यावर काम करणे सोपे जाईल. राज्यातला आणि देशातला कोणताही समाज आज मागे राहिलेला नाही, याचे खरे श्रेय कॉंग्रेस सरकारने राबविलेल्या महत्त्वाकांक्षी योजनांना आहे. राज्यात जर आघाडीचे सरकार आले तर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून विधिमंडळात महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण लागू करू अशी ग्वाही कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस, मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार आमदार बसवराज पाटील यांनी दिले.

ते महादेववाडी, भंगेवाडी, किनीथोट, देवांग्रा, येळी या गावांत ग्रामस्थांशी संवाद साधताना बोलत होते. आमदार पाटील म्हणाले, की कॉंगेस सरकारने भटक्या, विमुक्त जाती जमातींबाबत गांभीर्याने विचार करीत त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण, रस्ते, दिवाबत्ती, पाणी आणि निवारा आणि उद्योगधंद्यासाठी वित्तीय मदत मिळण्यासाठी विविध योजना अमलात आणल्या. अन्नसुरक्षा योजनेसारखी जगात सर्वांत मोठी योजना सुरू करून अन्नाची व्यवस्था केली, तर दुरीकडे मजुरांच्या हाताला काम नाही मिळाले तर त्यांना शंभर दिवस घरी बसून रोजगार मिळेल याची व्यवस्था केली.

Loading...

सोनिया गांधी, मनमोहन सिंह, शरद पवार यांनी यासाठी मोठे योगदान दिले. विश्वासाने लोकांनी भाजप-शिवसेना सरकारला सत्तेत बसविले, त्यांनी लोकांची घोर निराशा केली आहे. याचा विचार मतदारांनी जरूर करावा. योग्य विचार करून योग्य निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ असल्याचेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'