जे बोललो ते करून दाखविले – बसवराज पाटील

औसा: राजकारण करताना मतदारसंघाचा विकास डोळ्यासमोर ठेवून गेली दहा वर्षे काम करीत आहे. पहिल्या पाच वर्षांतील कामाची पावती म्हणून मतदारांनी पुन्हा दुसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिली आणि याही टर्ममध्ये विकासकामांसाठी जेवढे शक्य होते तेवढे मी देण्याचा प्रयत्न केला. जे बोललो ते करून दाखविले, गावागावांत सामाजिक सलोख्याबरोबर लोकांची प्रश्ने सोडवीत राजकारणात नवतरुणांना संधी उपलब्ध करून दिली. त्यामुळे या मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलला असल्याचे मत आमदार बसवराज पाटील यांनी व्यक्त केले.तालुक्यातील उत्का, उत्का तांडा येथे गावभेट अभियानात ते ग्रामस्थांशी बोलत होते.

आमदार  पाटील म्हणाले, की गेल्या साठ वर्षांत कॉंग्रेसने लोकशाही बळकट करण्याचा प्रयत्न केला. लोकांना त्यांचे आचार-विचार, राहणी, खाण्यापिण्याच्या स्वातंत्र्याबरोबरच त्यांचे व्यक्तिस्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला. सर्व जातिधर्मांना सोबत घेऊन जात कॉंग्रेसने विकासाची कामे केली. आम्ही मतदारांसमोर लोकांसाठी काय केले? काय करणार आहोत, याचा आराखडा घेऊन जात आहोत. मात्र, सध्या विपरीत परिस्थिती असून सत्तेत असणारी मंडळी भूलथापा देत चक्क खोटे बोलत लोकांना मूर्ख बनवून सत्तास्थापनेसाठी काहीपण करण्यास मागेपुढे बघत नाहीत.

Loading...

मराठवाड्यातील लोक सध्या भीषण परिस्थितीचा सामना करीत असताना त्यांना मदतीचा हात देण्याऐवजी त्यांना भावनिक बनवून दुसरीकडे भरकटवले जात आहे. एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे गेल्या पाच वर्षांपासून मराठवाडा आणि औशातील शेतकरी अडचणीत सापडला, कधी अवकाळी, गारपीट, अतिवृष्टी आणि नापिकीमुळे शेतीचे आणि शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलले आहे. यावेळी तर बहुतांश भागांत खरिपाच्या पेरण्या झाल्या नाहीत. कर्जमाफी असो; दुष्काळी अनुदान अथवा कोणत्याही प्रकारची मदत सरकारने दिली नाही.

पीकविम्याबाबत जाणीवपूर्वक अन्याय झाला आहे. ही बाब वेळोवेळी अधिवेशनात सरकारच्या निर्दशनास आणून दिली; मात्र केवळ आश्वासनांपलीकडे काहीच पदरात पडले नाही. याबाबत काहीच न बोलता इतर मुद्यांवर बोलून लक्ष विचलित केले जाते हे दुर्देव आहे. आता याबाबत सरकारला जाब विचारण्याची वेळ आली आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर आघाडीचे सरकार येण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
राज्य सरकारला 'मोठा धक्का' ; अध्यादेश काढायला राज्यपालांनी नकार दिल्यामुळे आली नामुष्की