Basavaraj Bommai | हुबली : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील मंत्र्यांना इशारा दिला आहे. सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी कर्नाटकात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास योग्य ती कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोमवारी दिला. यापूर्वी देखील बोम्मई यांनी हा इशारा दिला होता.
मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, “महाराष्ट्राच्या मंत्र्याने राज्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या मंत्र्यांचा दौरा सध्याच्या परिस्थितीत योग्य नागही. त्यांच्या दौऱ्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होईल. महाराष्ट्राच्या मंत्र्यांचा दौरा म्हणजे चिथावणीखोर कृत्य आहे. शिवाय, हे लोकांच्या भावना भडकवण्यासारखे आहे.”
महाराष्ट्र राज्यासोबतचा सीमावाद हा कर्नाटकसाठी बंद झालेला अध्याय आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील लोकांमध्ये एकोपा आहे. तसेच सीमेचा वाद आहे. हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात देखील आहे, असे बोम्मई म्हणाले.
भाजप-शिवसेना युती सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांनी 6 डिसेंबर रोजी बेळगावला भेट देणार असल्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा इशारा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | “महाराष्ट्राचे 2 मंत्री कर्नाटक सरकारच्या सुरक्षेसाठी काम करतात”; ठाकरे गटाचा निशाणा कुणावर?
- Thackeray-Ambedkar | ठाकरे गट आणि वंचितच्या युतीवर आज होणार निर्णय? आजच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष
- Hair Care | हिवाळ्यामध्ये केसांना मऊ ठेवण्यासाठी वापरा ‘हे’ दालचिनीचे हेअरमास्क
- Chandrashekhar Bawankule | “ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर आधीपासून एकत्रच”; चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान
- PAK vs ENG | इंग्लंडला मोठा झटका! लियाम लिव्हिंगस्टन पाकिस्तान दौऱ्यातून बाहेर