स्वतःचे अपयश झाकण्यासाठी बार्शी तालुका उस्मानाबादमध्ये समाविष्ट करण्याचा ठराव

बार्शी : गेल्या काही दिवसांपूर्वी बार्शी तालुक्याचा मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात समाविष्ट करावा, अशी मागणी करणारा ठराव बार्शी नगर पालिकेतील सत्ताधारी भाजपने सर्वसाधारण सभेत बहुमताने मंजूर केला. गेल्या अनेक दिवसांपासून बार्शी तालुका मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्यात समाविष्ट करावा याबाबत चर्चा चालू आहे. त्याअनुषंगाने हा ठराव केला गेला आहे. परंतु हा ठराव फक्त स्वतःच्या स्वर्थापोटी केला असल्याची टीका विरोधकाकडून होत आहे.

Loading...

बार्शी तालुका उस्मानाबाद जिल्ह्यात समाविष्ठ करण्याबाबत विरोधी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक या सर्वसाधारण सभेत तटस्थ राहिले़. यावेळी विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी या विषयावर जनमत घेण्याची मागणी केली. याविषयावर सत्ताधारी भाजपाची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष राष्ट्रवादी-कॉंग्रेस कडून होत आहे. राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, बार्शी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जीवनदत्त आरगडे यांनी याबाबत सत्ताधारी भाजपावर टीका केली आहे.

“सत्तेत आल्यापासून बार्शीचा विकास करण्यात सत्ताधारी पक्ष कमी पडला आहे. ते अपयश लपवण्यासाठी बार्शी तालुका उस्मानाबाद जिल्ह्यात समाविष्ठ करण्याची नवी खेळी खेळली जात आहे. शेतक-यांना मराठवाड्यात गेल्यावर फार मोठा लाभ होईल असा काहीतरी भावनिक मुद्दा लोकांसमोर आणून लोकांना संभ्रमात पडण्याची कामे केली जात आहेत. ज्यांनी बार्शी तालुका उस्मानाबाद जिल्ह्यात समाविष्ट करण्याबाबतचा विषय आणला आहे त्यांनी याबाबत लोकांसमोर सांखिकी आकड्यासह यावे. त्याबत शहर आणि तालुक्यातील लोकांची जनमत चाचणी घ्यावी.” – नागेश अक्कलकोटे (विरोधी पक्षनेते बानपा)

“बार्शीचे रेल्वे स्टेशन जसे हट्टाने आणि आपल्या सोयींनी उस्मानाबादच्या शिवाराजवळ नेले तसेच आणखी बार्शी सुद्धा उस्मानाबादमध्ये नेण्याची मानसीकता ही स्वार्थापोटीच आहे. शेतक-यांना मराठवाड्यात गेल्यावर फार मोठा लाभ मिळेल ही अशा फोल आहे. राज्यात योजना सर्वाना सारख्याच असतात..आणि नापिकी व दुष्काळ अतिवृष्टीचा सर्वे प्रशासनाकडून कसा जातोय याच्यावर राजकीय नेत्यांनी लक्ष ठेवले म्हणजे शासकीयय मदतीचा ओघ येताच असतो त्यासाठी आपण मराठवाड्यात जाऊ असे म्हणणे उचित ठरणार नाही. या कामी काँग्रेसचा तीव्र विरोध राहील. बार्शीकरांनी काँग्रेसच्या विचारांवर विश्वास ठेऊन आम्हाला या विषयी साथ द्यावी. स्थानिक मुर्दाड विरोधकांकडून काही होईल ही अपेक्षा नाही. नगरपरिषदेचे नेते राऊत हे नरेंद्र मोदींचा स्थानिक अवतार असून त्यांनी परिणामांचा विचार न करता हुकूमशाही प्रवृत्तीने नोटबंदी केली तर हे जिल्हाबंदी करताहेत.” – जीवनदत्त आरगडे (अध्यक्ष -बार्शी शहर काँग्रेस कमिटी)

2 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...