बारामतीमध्ये धक्कादायक निकाल लागणार, म्हणूनच पवारांचे ‘ते’ विधान – कुल

टीम महाराष्ट्र देशा : बारामती लोकसभा मतदारसंघात धक्कदायक निकाल लागणार आहे, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना याची जाणीव झाल्यानेच त्यांनी ईव्हीएमवर शंका घेतली, असा टोला दौंडचे आ .राहुल कुल यांनी लगावला आहे. बारामतीकर जनता यंदा राष्ट्रवादीची गंमत करणार असून भाजपच विजयी होईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

Loading...

आ. राहूल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना भाजपकडून बारामती लोकसभा मतदारसंघात उमेदवारी देण्यात आली आहे, सुरुवातीला खा सुप्रिया सुळे यांना सोप्या वाटणाऱ्या निवडणुकीत कुल यांनी चांगलेच आव्हान उभे केले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजपच्या डझनभर नेत्यांनी बारामतीमध्ये प्रचार केला आहे.

राष्ट्रवादीची भिस्त बारामती विधानसभेवर आहे, मात्र त्यांचा यंदा अपेक्षाभंग होणार आहे. इतर पाच तालुक्यात कमळाला चांगले मताधिक्य मिळेल. खडकवासल्यात आम्ही सर्वाधिक लीड घेऊ आणि राष्ट्रवादीला पराभवाची धूळ चाखायला लावू, असा दावाही राहुल कुल यांनी केला आहे.Loading…


Loading…

Loading...