मोठी बातमी : बारामतीतील ओबीसी एल्गार मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली

obc morcha

बारामती : ओबीसींचे अतिरिक्त राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. यानंतर ओबीसी समाजाकडून येत्या 29 जुलै रोजी बारामतीमध्ये पक्ष विरहित एल्गार महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या एल्गार मोर्चात ओबीसी प्रवर्गात येणाऱ्या सर्व जातींचा समावेश असणार आहे.

दरम्यान, आता राज्यातील वाढत्या कोरोनाचे कारण देत बारामती पोलिसांनी या मोर्चासाठी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आता हा मोर्चा काढण्यात येणार की नाही, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मोर्चाला अवघा आठवडा शिल्लक असताना बारामती पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकरली आहे. बारामतीत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे मोर्चाच्या आयोजनामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे एकावेळी पाच पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येऊ नये, अशी सूचना करण्यात आली.

तसेच मोर्चा काढण्यापेक्षा तुमचे म्हणणं कायदेशीर मार्गाने मांडा, असा सल्लाही पोलिसांनी दिला आहे. तसेच यासंबंधी नोटीस बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी जारी केली आहे. त्यामुळे आता राज्यातील ओबीसींचा पहिला एल्गार मोर्चा निघणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या