माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांच्या बारामतीत शेतकरी रस्त्यावर

टीम महाराष्ट्र देशा : शेती, पीक प्रक्रिया, दूध उत्पादन, विक्री, मुला-मुलींचे शिक्षण या क्षेञामधूनच बारामतीच्या विकासाला गती मिळाली आहे. देशाचे माजी कृषिमंञी शरद पवार यांनी गेल्या चाळीस वर्षामध्ये बारामतीचा खूपच चांगला विकास केला आहे. देशात बारामती सारखी शंभर शहरे उभी राहतील तेव्हा भारत खरा विकसित होईल अशा शब्दात केंद्रीय अर्थमंञी अरुण जेटली यांनी पवारांवर स्तुतिसुमने उधळली. माञ दुर्देवी बाब म्हणजे पवारांच्या बारामतीत आठवडे बाजारात शेतकरी रस्त्यावर बसत असल्याचे विदारक चिञ पाहावयास मिळत आहे.

शहराची वाढती लोकसंख्या व भाजी मंडईमधील सुविंधावर पडणारा ताण, आणि त्यामुळे निर्माण होणा-या समस्या या सर्व बाबतीत विकासात्मक निर्णय घेऊन माजी उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कोट्यावधी रुपये खर्च करुन महाराष्ट्रात आर्दश ठरावी अशी देखणी भाजी मंडई उभारण्यात आली. माञ या सुज्ज भाजीमंडईत बारामतीतील शेतकरी व भाजी विक्रेत्यांना पुरेशी जागा उपलब्ध होत नसल्याने शेतकरी रहदारीच्या रस्त्यांवर भाजी विक्री करताना दिसतात.

बारामती शहर हे हगणदारीमुक्त शहर म्हणून घोषित केले आहे. माञ कोट्यावधी रुपये खर्चून ही भाजी मंडईत उभारण्यात आलेले २२ स्वच्छतागृहे बंद अवस्थेत आहे. तसेच इतरञ परिसरात भाजी विक्रीसाठी येणा-या शेतकरी व ग्राहकांसाठी स्वच्छतागृह उपलब्ध नसल्याने लघुशंकेसाठी उघड्यावरच जात असल्याचे चिञ आहे.

मोदींचे अनुकरण करत इम्रान खान यांनी दिला ‘स्वच्छ पाकिस्तान’चा नारा