fbpx

खा. रणजीतसिंह निंबाळकरांची जीत, बारामतीला बेकायदेशीर रित्या पळवलेले पाणी खंडित

टीम महाराष्ट्र देशा : राज्यसरकारने शरद पवार यांना धक्का बसेल असा निर्णय घेतला आहे. नीरा डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे बेकायदेशीरपणे पाणी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नीरा डाव्या कालव्यातून बारामतीला बेकायदेशीर रित्या होणारा पाणीपुरवठा बंद व्हावा यासाठी खा. रणजितसिंह निंबाळकर यांनी जलसंपदा मंत्री गिरीश बापट यांच्याकडे शिफारस केली होती.

गेले काही दिवस नीरा डावा कालव्याच्या प्रश्नावरून भाजप नेते खा. रणजितसिंह निंबाळकर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात मतभेद पाहिला मिळत आहे. तर आज नीरा डाव्या कालव्यातून बारामतीला जाणारे बेकायदेशीरपणे पाणी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत नीरा कालव्यातून आता फलटण आणि माळशिरस या तालुक्यांत हे पाणी जाणार आहे. याबाबत जलसंपदा विभागाने आदेश काढला आहे. या निर्णयाचा फटका बारामतीशेजारील इंदापूर या तालुक्यालाही बसणार आहे.