fbpx

बारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ : जानकर

पुणे : मी स्वतः दिल्लीमध्ये काम करण्यास इच्छुक आहे. मी लोकसभा निवडणूक लढवणार आहे, अशी घोषणा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केली आहे. बारामती हा माझा आवडता आणि प्रेमाचा मतदारसंघ असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

त्यामुळे महादेव जानकर आगामी निवडणुकीतही बारामतीतूनच लढणार असणार निश्चित झालं आहे. बारामतीतून खासदार सुप्रिया सुळे आणि महादेव जानकर यांच्यात लढत होणार असल्याचे दिसत आहे. आपण एनडीए सोबतच असणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. केंद्रात आणि राज्यात येणारं सरकार भाजपाचेच असणार असून राष्ट्रीय समाज पक्ष हा त्यातील एक घटक पक्ष असणार असल्याचेही जानकर यांनी यावेळी सांगितले आहे.

लोकसभेच्या २११४च्या निवडणुकीत महादेव जानकर यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात 4.5 लाखापेक्षा जास्त मतं मिळाली होती. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीतून महादेव जानकर हे बारामतीतून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

2 Comments

Click here to post a comment