नाशिकमध्ये भाजप आमदाराचा महाप्रताप; देशभक्तीपर कार्यक्रमात नाचवल्या मुली

टीम महाराष्ट्र देशा: २६ जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्त नाशिकच्या कामटवाडा परिसरात एका देशभक्तीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत. पण प्रत्यक्षात मात्र या कार्यक्रमात तरुणींचे अश्लील नृत्य आयोजित करण्यात आले होते. यावेळी या मुलींनी अश्लील हावभाव करत उपस्थितांसमोर नाच केला. यात गंभीर बाब म्हणजे या कार्यक्रमाला भाजपचे आमदार अपूर्व हिरे उपस्थित होते. त्यांच्याच कार्यक्रत्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.

बर एवढ्यावरच या महाशयांचे प्रताप थांबले तर नवलच या कार्यक्रमावेळी उपस्थितांनी चक्क व्यासपीठावर जाऊन या तरुणींच्या अंगावर पैसे उधळले. प्रजासत्ताक दिनी असा अश्लिल प्रकार करताना भाजप कार्यकर्त्यांना लाज कशी वाटली नाही हाच मूळ विषय आहे.

अपूर्व हिरे हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी नेमकी कोणती देशभक्ती दाखवली असा संतप्त सवाल उपस्थित होतोय.

You might also like
Comments
Loading...