न्यायाधीशांच्या वादात बार कौन्सिल घडवून आणणार समेट

suprim court

टीम महाराष्ट्र देशा- सर्वोच्च न्यायालयातील चार वरिष्ठ न्यायमूर्तींनी सरन्यायाधीशांच्या कार्यपद्धतीविषयी उघडपणे नाराजी व्यक्त केल्यानंतर निर्माण झालेल्या वादावर तोडगा काढण्यासाठी बार कौन्सिल सरसावली आहे. बार कौन्सिलच्या दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.७ सदस्यीय समिती स्थापना यासाठी बार काउन्सिलने केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे ४ न्यायाधीश आणि सरन्यायाधीश यांच्यातील वाद मिटवण्याचे काम ही समिती करणार आहे.

न्यायपालिकेची प्रतिमा अबाधित राहायला हवी. नागरिकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, असे ते म्हणाले. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्र हे या वादावर तोडगा काढण्यासाठी आज सकाळीच सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या घरी गेले होते. मात्र सरन्यायाधीश घरी नसल्याने ही बैठक होऊ शकली नाही.लवकरच या समितीचे सदस्य नाराज न्यायाधीशांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे समजून घेतील, अशी माहिती बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी आज प्रसारमाध्यमांना दिली.