ATM मशीनमधील बाप्पाच्या देखाव्याने वेधले सर्वांचे लक्ष; सुबोध भावेचा व्हिडीओ चर्चेत

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये आणि घरोघरी गणरायाची मोठ्या भक्तीभावानं प्रतिष्ठापना करण्यात येते. 10 सप्टेंबर 2021 पासून पुढे 10 दिवस हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षी  गणपती बाप्पासाठी केलेल्या सजावटीची देखील विशेष चर्चा असते. अभिनेता सुबोध भावे याने बाप्पासाठी साकारलेल्या ‘टोकियो ऑलिम्पिक 2020′ चा साकारलेल्या देखाव्याची देखील चांगलीच चर्चा रंगली होती. त्यानंतर आता सुबोध भावेने त्यांच्या भावाच्या गणपतीसाठी साकारलेल्या सजावटीचा एक खास व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे.

सुबोध भावे यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये त्यांच्या भावाने ATM मशीनमधील बाप्पाचे दर्शन घडवले आहे. तसेच ATM मशीनमधील बाप्पा भक्तांना प्रसाद देखील देतो. या मशिनमध्ये प्रेम, शांती, पूर्णत्व, जीवन, भक्ती, दान, क्षमा असे वेगवेगळी बटन देखील देण्यात येणार आहे. या मशीनमध्ये कार्ड टाकल्यास यातून प्रसाद स्वरूपी मोदक देण्यात येते. तसेच येथे एक खोटा सीसीटीव्ही कॅमेरा देखील लावण्यात आला आहे. अशा पद्धतीने एक हुबेहुब ATM मशीनमधील बाप्पाचे दर्शन घेण्यात येत आहे.

या अनोख्या देखाव्याची सध्या  चर्चा होत असून, अनेकांनी संजय कुलकर्णी यांच्या कलेचे कौतुक करत आहे. दरम्यान, सुबोध यांच्या गणपतीच्या देखाव्याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यासोबतच आता ATM मशीनच्या देखाव्याने देखील पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले आहे.

महत्वाच्या बातम्या