‘बाप्पा माझा’च्या वतीने पुण्यात छायाचित्र प्रदर्शन आणि स्पर्धेचं आयोजन

bappa maza

पुणे- बाप्पा माझा या ग्रुप च्या वतीने पुण्यात छायाचित्र प्रदर्शन आणि स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.गणेशोत्सव आणि भारतीय सण असा या स्पर्धेचा विषय असून या स्पर्धेचं हे तिसरे वर्ष आहे.जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रदर्शन आणि बक्षीस समारंभ आयोजित करण्यात येणार आहे.तरी इच्छुकांनी मोठ्याप्रमाणावर या स्पर्धेत सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलं आहे.

bappa maza comp

बाप्पा माझा हा पुण्यातील गणेश भक्तांचा ग्रुप आहे. पुण्यातील गणेशोत्सवाचे फोटो जगभरातील गणेश भक्तांपर्यंत पोहचावे यासाठी जवळपास ५० छायाचित्रकार गणेशोत्सवाच्या काळात या ग्रुप सोबत विनामोबदला काम करत असतात. या छायाचित्रकारांनी टिपलेल्या बाप्पाच्या छबी बाप्पा माझा या फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम च्या माध्यमातून जगभरात पोहोचवल्या जातात.या तरुणांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे जगभरातील गणेशभक्तांपर्यंत पुण्यातील गणेशोत्सव जगात पोहचत आहे.बाप्पा माझा पेजला फेकबुक वर ३७००० लाईक्स आहे तर इंस्टाग्राम वर ४८००० फॉलोअर्स आहेत.

dagadushet

स्पर्धेचं स्वरूप –
विषय – गणेशोत्सव आणि भारतीय सण
कॅटेगरी – DSLR आणि मोबाईल फोटोग्राफी,
 bappagrapher14@gmail.com  या मेल आय डी वर प्रत्येक विभागातील(कॅटेगरी) कमीत कमी तीन फोटो पाठवा

– प्रवेश फी 8888881412 या नंबर वरती १००/- फी पेटीएम करा.
– वरील स्पर्धे साठी ट्रॉफी आणि आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे .
प्रदर्शनाचे ठिकाण -राजा रवीवर्मा आर्ट गॅलरी ,घोले रोड क्षेत्रीय कार्यालय, शिवाजीनगर ,पुणे