राज्यातील पेट्रोलपंपांवर लवकरच काचेची माप –गिरीश बापट

Bapat on petrol pump issue

नागपूर :  राज्यातील पेट्रोलपंपांवर लवकरच मेटलऐवजी काचेची माप ठेवण्यात येईल. राज्याने केंद्राकडे तसा प्रस्ताव पाठवल्याची माहिती नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी औचित्याच्या मुद्यावर दिली. काँग्रेसचे सदस्य संजय दत्त यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे राज्यातील पेट्रोलपंप घोटाळ्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

पेट्रोलपंपांवरील चिपमुळे ग्राहकांना पूर्ण पेट्रोल मिळत नाही, असे संजय दत्त यांनी सांगितले. आतापर्यत एकूण 186 पेट्रोलपंपांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 88 पेट्रोलपंपांवर चिप लावल्याचे आढळून आली. यापैकी 59 पेट्रोलपंप जप्त केले. तर 8 पूर्णपणे बंद करण्यात आले.

या प्रकरणी 33 जणांना अटक करण्यात आली. त्यामध्ये 14 पेट्रोलपंप चालक असल्याचे बापट यांनी सांगितले. तर 57 पेट्रोलपंपचालकांनी न्यायालयात जाऊन स्टे मिळवला. सहा पेट्रोल कंपन्यांना बोलावून समज देण्यात आल्याचे बापट यांनी सांगितले. यापुढे घोटाळा झाल्यास कंपनीचा विक्री अधिकारीही जबाबदार राहिल, असे त्यांनी स्पष्ट केले.