वडाचं झाडं होणार संमेलनाचं अध्यक्ष…

टीम महाराष्ट्र देशा – १३ आणि १४ फेब्रुवारी रोजी बीडमधील पालवणच्या डोंगरावर वृक्ष संमेलन आयोजित करण्यात आलं असून संमेलनाच्या अध्यक्षपदी असणार आहे वडाचे झाडं. याबाबतची माहिती संमेलनाचे आयोजक अभिनेते सयाजी शिंदे आणि लेखक अरविंद जगताप यांनी औरंगाबाद येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

सयाजी शिंदे म्हणाले पालवणच्या डोंगरावर आम्ही गेली तीन वर्ष काम करत असून आतापर्यंत दीड लाख झाडं लावली आहे. त्यामुळे हे संमेलन म्हणजे एक जनजागृतीचा प्रयत्न असून आम्ही अध्यक्षपदी वडाचे झाडं आहे. वडाच्या झाडासाठी प्रसिद्ध असलेला बीड जिल्यात आपण हे संमेलन घेत आहे म्हणून अध्यक्षसाठी वडाच्या झाडाची नेमणूक केली आहे.

Loading...

या संमेलनाला महाराष्ट्रतील पर्यावरणतज्ञ येणार असून या माध्यमातून बीडमधील विध्यार्थ्यांना त्यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच या संमेलनात वृक्ष दिंडी, चर्चासत्रे, लोककला अश्या स्वरूपाचे कार्यक्रम असतील असेही शिंदे म्हणाले.

अरविंद जगताप अधिक माहिती देताना म्हणाले, हे संमेलन दिखाऊपणा करण्यासाठी नसून जनजागृती हा आहे. विद्यार्थ्यांना झाडांबद्दल माहिती मिळावी . झाडं जगवण्यातील संघर्ष त्यांना कळावा तसेच त्यांना देशी झाडांची माहिती मिळावी हा हेतू आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई
तर पवारांची औलद सांगणार नाही, अजित पवारांची भीष्मप्रतिज्ञा
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
दणका राज ठाकरेंचा ! औरंगाबादमध्ये 'मनसे गद्दाराची' केली 'हकालपट्टी'