पुणे शहर कॉंग्रेसमधील अंतर्गत कलह पुणेरी फलकावर

banners-against-congress-leader-vishwajeet-kadam-in-pune,

कमी  शब्दात जास्तीत जास्त शाल जोडे म्हणजे पुणेरी फलक. उपहासात्मक टीकेसाठी पुणेरी पाट्या चांगल्याच प्रसिद्ध आहेत. गेल्या काही महिन्यापासून पुण्यामध्ये अनेक नेत्यांना या पुणेरी फलकांचा सामना करावा लागला आहे, आता पुन्हा एकदा हे फलक चर्चेत आले असून आता टार्गेट आहेत ते युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम. ‘विश्वजीत तूच आहेस पक्षाच्या अधोगतीचा शिल्पकार ‘ असा मजकूर या फलकांवर लिहिण्यात आला आहे. तसेच पुण्यातून परत सांगलीला जाण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा कॉंग्रेसमधील अंतर्गत कलह उफाळून आला आहे. लोकसभा निवडणुकीत कदम यांनी पुण्यातून निवडणूक लढवली होती मात्र भाजपचे अनिल शिरोळे यांनी त्यांचा दारूण पराभव केला होता. तेव्हापासून सुरु झालेली कॉंग्रेसची पराभवाची मालिका महापालिका निवडणुकीतही पहायला मिळाली. कधी काळी महापालिकेवर एक हाती सत्ता असणाऱ्या कॉंग्रेसला पालिका निवडणुकीत केवळ ९ जागा जिंकता आल्या आहेत.