सलग चार दिवस बँका बंद; एटीएम मध्ये देखील कॅशचा तुटवडा जाणवू शकतो

बँका बंद

वेब टीम:- बँक आणि बँकामध्ये असणारी गर्दी हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. सलग सुट्या आल्या की बँका हमखास सुट्या येतात. एटीएम च्या भरवश्यावर असाल तर जरा थांबा कारण बँकां बंद असल्यामुळे एटीएम मधे देखील कॅशचा तुटवडा जाणवणार हे मात्र नक्की आहे. त्यामुळे बैंकिंग क्षेत्राच्या संबंधितली कामे आधीच आपटून घ्यावी लागतील.

कधी व का बँक बंद असतील

  • 28 एप्रिल- चौथा शनिवारची सुट्टी
  • 29 एप्रिल-  रविवारची सुट्टी
  • 30 एप्रिल- बुद्धपोर्णिमाची सुट्टी
  • 1 मे – महाराष्ट्र दिनानिमित्त सुट्टी

28 एप्रिल पासून सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 28, 29, 30 एप्रिल आणि 1 मे रोजी सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. महत्त्वाची कामे असतील तर ती 28 एप्रिलच्या अगोदर आटोपून घ्या. कारण चार दिवस सलग बँका बंद राहणार आहेत.
या चार दिवसांत आर्थिक व्यवहार करण्यासाठी ग्राहकांना एटीएमचा पर्याय उपलब्ध असणार आहे परंतु बँकां बंद असल्यामुळे एटीएम मध्ये देखील कॅशचा तुटवडा जाणवू शकतो. सलग चार दिवस बँका बंद असल्याने नंतर बँका उघडल्यावर बँकेत मोठी गर्दी होण्याची देखील शक्यता आहे.Loading…
Loading...