‘कर्जासाठी बँका बंद, गांजा पेरण्यासाठी परवानगी द्या’, शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

हिंगोली : कोरोनाच्या कडक निर्बंधामुळे राज्यभरात फक्त ठराविक वेळेत अत्यावश्याक सेवा सुरू आहेत. बँकांचे कामकाजही कमी करण्यात आले आहे. त्यामुळे कर्जासाठी शेतकरी अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत आहेत. त्यातच सेनगाव तालुक्यात अवकाळी पावसामुळे मागच्या वर्षीपासून शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून. खरीप हंगाम जवळ येऊनही शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी पैसे नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात गांजा पेरण्याची परवानगी द्यावी. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सेनगाव तालुक्यात गेल्या वर्ष भरापासून अवकाळी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना मागच्या वर्षातील पिक कर्ज अजुन मिळाले नाही. आणि आता यावर्षी खरीप हंगाम जवळ आला आहे. परंतु जिल्हाधिकारी यांनी ऐन वेळेवर बँका बंद केल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील बँकाकडून शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप करुन पूर्ण झाले असताना हिंगोली जिल्हा काय पाकिस्तानमध्ये आहे का? असा प्रश्न स्वाभिमानीने प्रशासनाला विचारला आहे.

अजून पिक कर्ज वाटप चालू होत नाही. जिल्हाधिकारी यांनी आदेश काढला की, व्यापाऱ्यांचा व्यवहार सुरु मात्र शेतकऱ्यांचा व्यवहार बंद.घ रात खत नाही. बी नाही. बँकाचं कर्ज नाही. दरवर्षी मोठ्या मेहनतीने पेरणी करुन हाती काहीच नाही. एवढे करुन आता काय गांजा पेरणी करावे का ? त्यामुळे आपण गांजा पेरण्याची परवानगी तरी द्यावी अशा मागणीचे निवेदन मंगळवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदारामार्फत थेट मुख्यमंत्र्याला पाठवण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या