आजच काढुन ठेवा बँकेतून पैसे ; उद्यापासून ४ दिवस बँका बंद !

टीम महाराष्ट्र देशा : चौथा शनिवार व रविवारला जोडून सलग दोन दिवस सुट्या आल्याने पुढील आठवड्यात सलग चार दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे खातेदारांना शुक्रवारपर्यंत म्हणजेच २७ एप्रिलपूर्वीच व्यवहार पूर्ण करावे लागणार आहेत.

२८,२९,३० एप्रिल व त्यानंतर एक मे अशा सलग चार दिवस बँकांना सुटी असल्याने बँकांचे कामकाज बंद राहणार आहे. २८ एप्रिलला चौथ्या शनिवारची, २९ एप्रिलला रविवारची तर ३० एप्रिलला बुद्धपौर्णिमेची सुटी आहे. एक मे रोजी कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त बँकांना सुटी असेल. त्यामुळे बँकांमधील व्यवहार हे आज व उद्याच पूर्ण करावे लागणार आहेत. काही ठिकाणी एटीएममध्ये पुरेशी रक्कम नसल्याने नागरिकांना रोख रकमेची तरतूद करून ठेवावी लागणार आहे.