आम्ही ‘चौकीदार’ होणार नाही, देशातील ‘या’ सर्वात मोठ्या संघटनेचे मोदींना पत्र

narendra modi sad

टीम महाराष्ट्र देशा: कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘ चौकीदार चोर है’ म्हणत टीकेची झोड उठवली होती. गांधी यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपने सोशल मिडीयावर ‘मै भी चौकीदार’ मोहीम चालवली आहे. यामध्ये बहुतांश भाजप नेत्यांनी आपल्या नावापुढे चौकीदार शब्द जोडला आहे.

दरम्यान, मोदी यांनी ट्विटवरून देशातील डॉक्टर, वकील, बँक कर्मचारी आणि आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ‘मैं भी चौकीदार’ मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. मात्र बँक कर्मचारी संघटनेने ‘चौकीदार’ बनण्यास नकार दिला आहे. इंग्रजी वृत्तपत्र बिझनेस स्टँडर्डने हे वृत्त दिले आहे. ‘द ऑल इंडिया बैंक ऑफिसर्स कन्फेडरेशन’ या बँक कर्मचाऱ्यांच्या देशातील सर्वात मोठ्या संघटनेने पत्र लिहित पंतप्रधानांना आपली बाजू सांगितली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून बँक कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. बँक कर्मचारी सरकारच्या धोरणांना कंटाळले आहेत. त्यामुळे मैं भी चौकीदार या राजकीय प्रचारमोहिमेत सहभागी होण्याची अपेक्षा करु नका. असे संबंधित पत्रात सांगण्यात आले आहे.