21 तारखेच्या आधीच आटोपून घ्या, आपले बँक व्यवहार !

state bank of india

नवी दिल्ली : आपले बँकेतील व्यवहार 21 तारखेच्या आत आटोपून घ्या. कारण, डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बँक कर्मचारी संपावर जाणार असल्याने पाच दिवस बँकां बंद राहणार आहेत. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी 21 डिसेंबरपासून बँक कर्मचारी संपावर जाणार आहेत. ख्रिसमस आणि वर्षअखेरीस फिरायला जाणाऱ्यांना 21 तारखेपूर्वीच पैशांची तजवीज करावी लागणार आहे. त्यात पाच दिवस बँका बंद राहणार असल्याने चेक क्लिअरन्स होण्यासही वेळ लागणार हे साहजिक आहे.

या संपावेळी कर्मचार्‍यांच्या वेतनवाढीचा मुद्दा केंद्रस्थानी असणार आहे. तसेच बँक कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात हा संप पुकारला जात आहे. बँक ऑफ बडोदा, देना बँक आणि विजया बँक यांच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावरुन बँक कर्मचार्‍यांकडून सरकारला धारेवर धरण्यात येणार आहे.

बँक सुट्या पुढील प्रमाणे असतील –

21 डिसेंबर – शुक्रवार असून याच दिवसापासून बँकांनी संपाची घोषणा केली आहे.

22 डिसेंबर – चौथा शनिवार

23 डिसेंबर – रविवार

24 डिसेंबर – सोमवारी बँका उघडतील, परंतु या दिवशी बँकेत अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे.

25 डिसेंबर – ख्रिसमस सुट्टी असल्याने बँका पुन्हा बंद राहतील.

या बाबत नॅशनल ऑर्गनायजेशन ऑफ बँक वर्करचे उपाध्यक्ष अश्वनी राणा म्हणाले की, देशभरात 10 लाख बँक कर्मचारी आहेत. बँक युनियन या संपाद्वारे केंद्र सरकारकडे 25 टक्के वेतनवाढीची मागणी करणार आहे.

आजच काढुन ठेवा बँकेतून पैसे ; उद्यापासून ४ दिवस बँका बंद !