‘यामुळे’ आठवडाभर बँका राहणार बंद, लवकर उरका व्यवहार

blank

टीम महाराष्ट्र देशा: केंद्र सरकारकडून दहा सरकारी बँकांच्या विलीनीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याविरुद्ध देशभरातील बँक अधिकाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे २६ व २७ सप्टेंबरला बँक बंद राहणार आहेत, २८ सप्टेंबर चौथा शनिवार, २९ ला रविवार असे सुट्टीचे दिवस आहेत. तर ३० सप्टेंबर व १ ऑक्टोबरला पुन्हा कर्मचाऱ्यांचा संप असणार आहे. २ ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची जयंती असल्याने सार्वजनिक सुट्टी राहणार आहे. सार्वजनिक सुट्ट्या आणि संपामुळे जवळपास आठवडाभर बँक बंद राहणार आहेत.

सध्या देशात असलेल्या सार्वजनिक क्षेत्रामधील 18 बँकांपैकी 14 बँका नफ्यामध्ये आहेत. सार्वजनिक क्षेत्रामधील बँकांपैकी काही बँकांचे विलीनीकरण करण्याच निर्णय घेतला आहे. यानुसार युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक यांचे पंजाब नॅशनल बँकेमध्ये विलीनकरण करण्यात येईल. या विलीनीकरणानंतर पंजाब नॅशनल बँक देशातील दुसरी सर्वात मोठी बँक बनेल. तर सिंडीकेट बँक , कॅनरा बँक , कॉरर्पोरेशन बँक, इंडियन बँक, अलाहाबाद बँक, युनियन आंध्रा बँक यांचे विलीनीकरण केले जाणार आहे.

दरम्यान, सरकारच्या निर्णयाला ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस आणि नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स यांनी विरोध दर्शविला आहे. निर्णयाच्या निषेधार्थ संपाचे हत्यार उपसण्यात आले आहे. या संपाला सर्व संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे.

महत्वाच्या बातम्या