बँक ऑफ इंडियाकडून ‘कोविड तत्काल सहाय्य’ आणि ‘कोविड -१९ वैयक्तिक कर्ज’; कर्जफेडीसही मुदतवाढ

पुणे : कोरोना विषाणू साथीच्या परिस्थितीत बँक ऑफ इंडियाच्या गृहकर्ज, वाहन कर्जफेडीस मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती बँकेचे विभागीय व्यवस्थापक राजेश इंगळे यांनी आज पत्रकाद्वारे दिली. रिझर्व्ह बँकेच्या सुचने प्रमाणे बँक ऑफ इंडिया ने गृह कर्ज, वाहन कर्ज इत्यादी रिटेल कर्जांचे मार्च, एप्रील, मे महिन्याचे हप्ते पुढे ढकलले आहेत. तीन महिन्याचे हप्ते नंतर भरण्याची सूट देण्या बरोबरच बँक ऑफ इंडिया ने कोविड (COVID) तत्काल सहाय्य, आणि कोविड -१९ वैयक्तिक कर्ज योजना जाहीर केल्या आहेत.

कोविड तत्काल सहाय्य योजने अंतर्गत व्यवसायासाठी घेतलेल्या कॅश क्रेडिट कर्जाच्या २० टक्के पर्यायी रक्कम ७.२५ टक्के ते ७.९५ टक्के व्याज दराने ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येणार असून ६  महिन्यानंतर १८ मासिक हप्त्यात परतफेड करायची आहे.

कोविड १९  वय्यक्तिक कर्ज योजनेत पगारदार ग्राहकाला पगाराच्या तिप्पट रक्कम वैयक्तिक कर्ज म्हणून मिळू शकते. गृह कर्ज घेतलेल्या ग्राहकाला मालमत्तेच्या रेसिड्युएल (RESIDUAL ) किमतीच्या २५ टक्के इतकी रक्कम वय्यक्तिक कर्ज म्हणून मिळू शकते. या योजनेत रुपये ५ लाखापर्यंत कर्ज ७.२५ टक्के दराने उपलब्ध असेल.

या दोन्ही योजनांसाठी प्रक्रिया शुल्क आकारले जाणार नाही, असेही राजेश इंगळे यांनी सांगितले. वाय्यक्तिक कर्ज ४८ तासात, व्यावसायिकांना ७२ तासात कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. ग्राहकांनी बँक ऑफ इंडिया च्या नजिकच्या शाखेत कागदपत्रे सादर केल्यास तातडीची मदत मिळू शकते, अशी माहिती या पत्रकात देण्यात आली आहे.

हेही पहा –