Bank of Baroda Recruitment | बँक ऑफ बडोदा यांच्यामार्फत ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

टीम महाराष्ट्र देशा: बँक परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी बँक ऑफ बडोदा Bank of Baroda यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे बँक ऑफ बडोदा बँक परीक्षेची तयारी करत असणाऱ्या इच्छुकांना मोठी नोकरी संधी उपलब्ध करून देत आहे. या भरती प्रक्रियेमध्ये बँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेवरील विविध व्यावसायिक पदांच्या एकूण 58 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या पदांसाठी पदानुसार पात्रधारक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी या पदांच्या संदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी bankofbaroda.in या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी.

बँक ऑफ बडोदा यांच्यामार्फत विविध पदांच्या 58 जागा

nmk.co.in या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार बँक ऑफ बडोदा यांच्या मार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये वरिष्ठ गुणवत्ता आश्वासन लीड, गुणवत्ता आश्वासन अभियंता, कनिष्ठ गुणवत्ता आश्वासन अभियंता, वरिष्ठ विकासक – फुल स्टॅक जावा, विकासक- फुल स्टॅक जावा, विकासक – पूर्ण स्टॅक .NET & JAVA, वरिष्ठ विकासक – मोबाइल ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट, डेव्हलपर – मोबाईल अनुप्रयोग विकास, वरिष्ठ UI/UX डिझायनर, UI/UX डिझायनर इत्यादी पदांच्या रिक्त जागा आहेत.

शैक्षणिक पात्रता

बँक ऑफ बडोदा यांच्या मार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्राज्ञान शाखेतून बी. ई./ बी. टेक (B.E/ B.Tech) पदवी उत्तीर्ण केलेली असावी. त्याचबरोबर तंत्रज्ञान पदासाठी सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी bankofbaroda.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख

बँक ऑफ बडोदा यांच्या आस्थापनेसाठी विविध पदांच्या 58 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 नोव्हेंबर 2022 आहे.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: बँक परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी बँक ऑफ बडोदा Bank of Baroda यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी …

पुढे वाचा

Marathi News