संतापजनक : पिककर्ज मंजुरीसाठी शेतकऱ्याचा पत्नीकडे शरीरसुखाची मागणी

टीम महाराष्ट्र देशा : मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बँक मॅनेजरने पिककर्ज मंजुर करण्यासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. फिर्यादीवरुन बँक मॅनेजरवर अ‍ॅट्रोसिटीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मॅनेजरला सहकार्य करणाऱ्या शिपायावरही गुन्हा दाखल केला आहे.

मलकापूर तालुक्यात उमाळी येथील शेतकरी गुरुवारी 14 जून रोजी सकाळी दाताळा येथील सेंट्रल बँकेत त्यांच्याकडे असलेल्या दोन एकर शेतीवर पिककर्ज मागणीसाठी पतीपत्नीसह गेले. सर्व कागदपत्रे जमा करून बँक मॅनेजरला पिककर्ज केव्हा मिळेल याबाबत विचारणा केली. बँक मॅनेजरने मोबाईल नंबर घेत मी कर्ज मंजुरीबाबत मोबाईलवर कळवितो असे सांगितले.