बँक कर्मचारी आज संपावर ; खासगी बँका सुरू राहणार

टीम महाराष्ट्र देशा : बँकांचे विलीनीकरण केले जाऊ नये, यासह इतर मागण्यांसाठी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्मचारी बुधवारी संपावर जाणार आहेत, खासगी क्षेत्रातील बँका मात्र बुधवारी चालू राहणार आहेत. विजया बँक आणि देना बँकेचे, बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण करण्याच्या केंद्राच्या निर्णयाला विरोध करीत गेल्या शुक्रवारीच बँक कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी संपावर गेले होते. याच मुद्द्यावर पुकारला जाणारा हा दुसरा संप होय. वेतनवाढीचीही मागणी कर्मचारी संघटनांनी लावून धरली आहे.

अखिल भारतीय बँक अधिकारी संघटना (एआयबीओसी), ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (एआयबीईए), नॅशनल कॉन्फिडरेशन ऑफ बँक एम्प्लॉईजसह नऊ संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू) संपाची हाक दिली आहे.