बँक कर्मचाऱ्यांचा २२ ऑगस्ट रोजी देशव्यापी संप

bank strike

नवी दिल्ली : बँकांचे एकत्रीकरण तसेच अन्य मागण्यांसाठी देशभरातील १० लाख बँक कर्मचारी २२ ऑगस्ट रोजी देशव्यापी संप पुकारणार आहेत . परिणामी मंगळवारी देशभरातील सर्व बँका बंद राहणार आहेत . आयसीआयसी, ॲक्सिस, कोटक महिंद्रा, एचडीएफसी या खासगी बँका संपात सहभागी होणार नाहीत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स या बँक कर्मचाऱ्यांच्या शिखर संघटनेने संपाची हाक दिली आहे .