मोठी बातमी: बँकांना हजारो कोटींचा चुना लावणाऱ्या मल्याचा ‘जावई’ पार्थ पवारांच्या प्रचारात

विरेश आंधळकर: मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे, उमेदवारी जाहीर झाल्यापासून पार्थ हे वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहेत. पहिल्याच भाषणात उडालेली धांदल, चर्चमध्ये जाऊन घेतलेली विवादित पाद्रीची भेट सर्वांच्या चर्चेचा विषय बनली.

आता बँकांना हजारो कोटींचा चुना लावणाऱ्या मल्याचा जावई पार्थ यांच्या प्रचारात फिरताना दिसत आहे. एका बाजूला राष्ट्रवादीचे नेते मल्यावरून मोदी सरकारवर टीका करत असताना त्याचा जावई पार्थसोबत दिसत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Loading...

विजय मल्ल्याचे जावई समर सिंग हे पार्थ पवार यांचे जवळचे मित्र असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पार्थ यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून समर सिंग कायम त्यांच्यासोबत आहे. एवढंच काय तर पार्थ आणि खुद्द अजित पवार यांच्या सोशल मीडिया स्ट्रेटजीची जबाबदारी देखील समर सिंग सांभाळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मध्यंतरी पार्थ पवार यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेतली होती, यावेळी देखील समर सिंग उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वच विरोधक विजय मल्ल्या, निरव मोदीवरून भाजपला टार्गेट करत आहेत, दुसरीकडे मात्र मल्याचा जावई शरद पवार यांच्या नातवासोबत फिरत असल्याने कार्यकर्ते देखील संभ्रमात आहेत. बँकांना हजारो कोटींचा चुना लावणाऱ्या मल्याचा जावई पार्थ यांच्यासोबत कायम दिसत असल्याने मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, समर सिंग यांच्याविषयी पार्थ पवार यांनी बोलण्यास नकार दिला आहे.

कोण आहेत समर सिंग

समर सिंग हे व्यवसायाने इन्व्हेस्टमेंट बँकर असून विजय मल्याची मुलगी लैला मल्याचे पती आहेत.

मावळात पार्थ पवार विरुद्ध श्रीरंग बारणे लढत

मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार विरुद्ध शिवसेनेचे विद्यमान खा. श्रीरंग बारणे यांच्यामध्ये प्रमुख लढत होते आहे. नवख्या पार्थला लोकसभेच्या मैदानात उतरवल्याने संपूर्ण पवार कुटुंबाला प्रचारासाठी जीवाचे रान करावे लागत आहे. तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक नेते मावळत तळ ठोकून आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
इंदुरीकर महाराज तुम्ही अजिबात त्रास करून घेऊ नका : रुपाली पाटील- ठोंबरे
जगात शिवसेनेएवढे 'नीच' राजकारण कोणीच करू शकत नाही
'आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचा दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन'
मी 'गमतीजमती' सुरु केल्या तर, तुमच्या मदतीलाही कोणी येणार नाही : अजित पवार
इंदुरीकर महाराजांचे वक्तव्य दुर्दैवी : खासदार सुप्रिया सुळे
तृप्ती देसाईंवर अश्लील टीका करणाऱ्यांचा किशोरी शहाणेंनी  घेतला समाचार
इंदुरीकर महाराज तुम्ही कीर्तन सोडू नका,संयम ठेवा,अवघा महाराष्ट्र आपल्या सोबत आहे : बानगुडे पाटील
आता 'यां'नीही केला CAA आणि NRC ला विरोध, शरद पवारांची घेतली भेट