fbpx

Bank Chor Movie- ‘बॅंक चोर’चा ट्रेलर रिलीज

मुंबई:  रितेश देशमुखच्या आगामी ‘बॅंक चोर’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच झाला आहे. ट्रेलर आणि पोस्टर एकत्रच लॉंच केले आहे. या चित्रपटात रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि रेहा चक्रवर्तीही दिसत आहेत. पोस्टरमध्ये रितेशच्या मागे विवेक ओबेरॉयही दिसत आहे. या चित्रपटात विवेकने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका निभावली आहे.

चित्रपटाचा ट्रेलर धूम पार्ट2 आणि धूम पार्ट3 च्या दृश्यांपासून सुरू होतो. ही दृश्ये संपताच आपले लक्ष्य वेधून घेतो एक साधू. जो बॅंक लुटण्यासाठी निघाला आहे. साधूच्या वेशात आहे रितेश देशमुख. जो एका मोठ्या टेबलवर उभा राहून लोकांवर ओरडताना दिसतो आहे.

View image on Twitter