बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खलिदा झिया यांना ५ वर्ष तुरंगवासाची शिक्षा

khalida ziya

ढाका : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि विरोधीपक्ष नेत्या खलिदा झिया यांना ढाका कोर्टाने पाच वर्षाची तुरंगवासाची शिक्षा ठोठावली. अनाथाश्रमासाठी राखीव निधीचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी शिक्षा ठोठावली आहे.

Loading...

बांगलादेशातील अॅन्टी करप्शन कमिशन (एसीसी) ने झिया यांच्यावर आरोप ठेवताना म्हटले की, बीएनपी २००१ ते २००६ मध्ये सत्तेत असताना झिया चॅरिटेबल ट्रस्ट ही केवळ कागदोपत्री दाखवण्यात आली होती. या ट्रस्टच्या नावाने मोठ्या प्रमाणावर परदेशी देणग्या घेण्यात आल्या होत्या. मात्र, या देणग्यांचा योग्य कारणासाठी वापर करण्यात आला नाही. न्यायालयाने झिया यांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर झिया समर्थकांनी न्यायालयाच्या परिसरात धुडगूस घातला. यामध्ये कमीत कमी ५ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्याचबरोबर दोन मोटारसायकली पेटवून देण्यात आल्या.Loading…


Loading…

Loading...