fbpx

गोळीबाराने न्यूझीलंड हादरले; बांग्लादेश क्रिकेट संघाचे खेळाडू थोडक्यात बचावले !

वेलिंग्टनः न्यूझीलंड येथील दक्षिणेकडील क्राईस्टचर्च शहरातील दोन मशिदीत मोठा हल्ला झाला आहे. हल्लेखोरांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ४०   जण ठार झाले असून २० जखमी झाले आहेत. न्यूझीलंड पोलिसांनी ४ जणांना ताब्यात असून, त्यात १  महिला तर ३ पुरुषांचा समावेश आहे.

हा हल्ला ऑस्ट्रेलियाचे नागरिक असलेल्या अतिरेक्यांनी घडवून आणला आहे, अशी माहिती खुद्द ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी दिली आहे.

दरम्यान, बांग्लादेशाची टीम सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. घटनास्थळी बांग्लादेशाच्या  क्रिकेट संघाचे खेळाडूही उपस्थित होते. गोळीबार झाला तेव्हा मशिदीत बांग्लादेश क्रिकेट संघाचे खेळाडूही होते. त्यांनी मशिदीतून एका गार्डनमधून ओव्हल मैदानाकडे धाव घेत आपला जीव वाचवला.