बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना केला खेळाडुच्या मृत्युचा उल्लेख; अश्विनच्या प्रतिक्रियेनंतर ट्विट हटवले

ढाका : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद नेहमी विविध देशांच्या खेळाडूंच्या वाढदिवसानिमीत्त शुभेच्छा देणाऱ्या पोस्ट शेअर करत असते. तर काही देशाचे क्रिकेट बोर्डही त्यांच्या खेळाडूना ट्विट करुन वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असते. याच प्रथेचा भाग म्हणुन बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने त्यांच्या एका खेळाडुला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र या ट्विटमध्ये त्यांच्याकडून एक चुक झाली.

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने त्यांचा माजी खेळाडू मंजुरल इस्लाम राणा याला वाढदिवसाची शुभेच्छा देणारी पोस्ट केली होती. मात्र या ट्विटमध्ये बोर्डाने राणाच्या मृत्युचा उल्लेखही केला होता. मंजुरल इस्लाम राणा हा बांग्लादेशचा एक माजी खेळाडू होता. मंजुरल राणाचे वयाच्या अवघ्या २२व्या वर्षी एका अपघातात निधन झाले होते. माजी खेळाडू मंजरुल इस्लाम राणा याच्या वाढदिवसाच्या ट्विटमध्ये बांगलादेश क्रिकेट बोर्डाने त्याच्या मृत्यूचा देखील उल्लेख केला.

या ट्विटमध्ये लिहीले होते, ‘मंजरुल इस्लाम राणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. सर्वात युवा कसोटी क्रिकेटर ज्याचा मृत्यु वयाच्या २२ वर्षे वय असताना मृत्युमुखी पडला.’ या ट्विटवर भारताचा क्रिकेटपटु आर अश्विनने धक्का बसलेले ईमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिली. यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डला चूक समजली व त्यांनी ते ट्विट डिलीट केले. तसेच बांगलादेश क्रिकेट बोर्डाने चूक दुरुस्त नवीन ट्विट करत लिहिले,’मंजरुल इस्लाम राणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आमच्यातील सर्वोत्तम टायगरपैकी एक.’ मात्र चुक झालेल्या ट्विटचा स्क्रिनशॉट व्हायरल झाला होता.

महत्वाच्या बातम्या