‘वांद्रे-कुर्ला संकुल जेव्हीएलआर पूल दुर्घटनेची चौकशी करणार’, एकनाथ शिंदेंची घोषणा

eknath shinde

मुंबई : बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये काम सुरु असलेला एका मोठ्या पुलाचा गर्डर कोसळला असून त्यामध्ये जवळपास २१ कामगार जखमी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळली आहे. ही घटना आज(१७ सप्टें.)सकाळी चार वाजेच्या सुमारास घडली असून जखमींना व्ही.एन. देसाई हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.

या दुर्घटनेची मूल्यमापन संस्था आणि एमएमआरडीएचे अधिकारी मिळून चौकशी करणार असल्याची घोषणा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसेच, या घटनेत जखमी झालेल्या कामगारांच्या उपचारासाठीचा संपूर्ण खर्च एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात येणार आहे असेही ते म्हणले. आज शिंदे यांनी या दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी एमएमआरडीए आयुक्त व्ही.श्रीनिवास राव, स्थानिक पोलीस अधिकारी, एमएमआरडीएचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

दरम्यान, यावेळी बोलत असतांना शिंदे म्हणाले की,’झालेली ही दुर्घटना पूर्णपणे दुर्दैवी असून या दुर्घटनेला जो कुणी जबाबदार असेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल’. तसेच ही दुर्घटना गर्डरचे बेअरिंग आणि नट बोल्ट यांच्यात त्रुटी राहिल्याने झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले, तरीही त्याची पूर्ण चौकशी करून त्यानंतरच दोषींवर कारवाई केली जाईल’ असेही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या