आंदोलक विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

violence-at-bhu

वेब टीम :विद्यार्थिनीच्या छेडछाडीनंतर बनारस हिंदू विद्यापीठात सुरु झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. तीन दिवसांपूर्वी विद्यापीठात एका विद्यार्थिनीसोबत छेडछाड झाली. याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी सुरु केलेलं आंदोलन 40 तास लांबलं होतं.शनिवारी कुलगुरुंना भेटण्यासाठी आंदोलक विद्यार्थिनी त्यांच्या निवासस्थानी पोहचल्या. परंतु तिथे त्यांच्यावर लाठीमार करण्यात आला. विद्यापीठाच्या मेन गेटबाहेर पोलिसांनी हा लाठीचार्ज केला.

पेट्रोल बॉम्बचा वापर

Loading...

विद्यापीठाचे कुलगुरु जी. सी. त्रिपाठी यांच्या निवासस्थानाजवळ आंदोलन करणाऱ्या विद्यार्थिनींवर रात्री १० वाजता पोलिसांनी लाठीमार केला. यामध्ये काही विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत. यानंतर संतप्त विद्यार्थिनींनी केलेल्या दगडफेकीत मोठ्याप्रमाणावर सुरु असणाऱ्या पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थिनिंकडून रात्री १२ नंतर बनारस हिंदू विद्यापीठाच्या वसतिगृहातून पेट्रोल बॉम्बदेखील फेकण्यात आले. यानंतर मोठा गोंधळ झाला. पेट्रोल बॉम्ब टाकण्यात आल्यामुळे आग लागण्याच्या घटना घडल्या. यानंतर २ ऑक्टोबरपर्यंत विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

रुग्णांना करावा लागला नाहक त्रास सहन 

पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर संतापलेल्या विद्यार्थिनींनी सर सुंदरलाल रुग्णालयात घसून दगडफेक तसेच मोठ्याप्रमाणावर तोडफोड केली. यामुळे रुग्णालयात गोंधळ निर्माण होऊन पळापळ सुरु झाली. विद्यार्थिनींनी केलेल्या दगडफेकीमुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागला. विद्यार्थिनींनी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर उभ्या असलेल्या दुचाकींना आग लावली.
राणे भाजपात गेल्यास शिवसेनेलाच फायदा!राणे भाजपात गेल्यास शिवसेनेलाच फायदा!कथा : हरवलेला महाराष्ट्रकथा : हरवलेला महाराया घटनेच्या चौकशीसाठी कुलगुरुंनी एका समितीची स्थापना केली आहे. याआधी विद्यार्थिनींनी कुलगुरुंविरोधातील नाराजी व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोस्टरला आग लावली होती. बनारस हिंदू विद्यापीठाच्या विद्यार्थिनी मागील तीन वर्षांमध्ये दोनवेळा सुरक्षेच्या मुद्यावरुन रस्त्यावर उतरल्या आहेत. विद्यार्थिनी हिंसक झाल्यानंतर विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती एसएसपी आर. के. भारद्वाज यांनी दिली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
पाच वर्ष सरकार चालवायचं आहे लक्षात ठेवा;शरद पवारांचा संजय राऊतांना सूचक इशारा
मलाही बेळगाव पोलिसांनी मारहण केली होती : शरद पवार
सचिन सावंत संभाजी भिडेंवर बरसले, म्हणतात...
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेला 'हा' युवा आमदार बनला ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
'माझे पप्पा' हा निबंध लिहून सर्वांच्या डोळ्याला पाणी आणणाऱ्या 'त्या' मुलाची धनंजय मुंडेंनी घेतली दखल