सत्तेत आल्यास सरकारी इमारतीतील संघाच्या शाखांना बंदी घालू : काँग्रेस

rss

भोपाळ – मध्य प्रदेशमध्ये विघानसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे राजकीय पारा चढला असून, काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोपप्रत्यारोपाच्या जोरदार फैरी झडू लागल्या आहेत. दरम्यान, राज्यात सत्ता आल्याचा शासकीय इमारती आणि परिसरात लागणाऱ्या संघाच्या शाखांवर बंदी घालण्याचे आश्वासन काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यातून दिले आहे.

काँग्रेस पक्षाने शनिवारी मध्य प्रदेश निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. काँग्रेसने हिंदु मतदारांना आकर्षित करण्यासाठी आपल्या जाहीरनाम्यात अनेक आश्वासने दिली आहेत. मध्य प्रदेशमध्ये दीर्घकाळापासून भाजपाचे सरकार सत्तेवर आहे. तिथे सरकारी कर्मचाऱ्यांना संघाच्या शाखेत जाण्याची मुभा सरकारने दिलेली आहे. तसेच सरकारी कार्यालयात संघाच्या शाखाही भरतात. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात या मुद्याला महत्व दिले आहे.