पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात काळे मास्क, टोपी आणि काळे कपडे घालण्यास बंदी

पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात काळे मास्क, टोपी आणि काळे कपडे घालण्यास बंदी

नरेंद्र मोदी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांची जगभरात खूप लोकप्रियता आहे. त्यांच्या स्वगातासाठी अनेक भागात उत्तम तयार केली जाते. येत्या २५ नोव्हेंबरला जेवर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहे. याकरीता याठिकाणी जोरदार तयारी सुरु करण्यात येत आहे. तसेच या कार्यक्रमाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे.

परंतु, याठिकाणी येण्यासाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत. यामुळे सध्या या कार्यक्रमाची जोरदार चर्चा रंगली आहे. पंतप्रधानांच्या या कार्यक्रमाला काळं मास्क, काळे कपडे किंवा काळी टोपी घालून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. या अनोख्या नियमामुळे सध्या या कार्यक्रमाची जोरदार चर्चा रंगली आहे.

जेवर जिल्ह्यामधील काही स्थानिकांचा या विमानतळाला विरोध आहे. त्यामुळेच काही लोक या कार्यक्रमामध्ये काळा कपडा दाखवून विरोध दर्शवण्याची आणि गोंधळ घालण्याची शक्यता असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे एका वृत्तवाहिनीने स्पष्ट केले आहे. काही स्थानिकांनी विमानतळाचे नाव सम्राट मिहिर भोज असे ठेवण्यात यावे अशी मागणी केली.

दरम्यान, पंतप्रधानांबरोबर या वेळेस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही उपस्थित राहणार आहे. गौतमबुद्ध पोलीस स्थानकाचे पोलीस अधिक्षक अलोक सिंह हे मागील काही दिवसांपासून सतत या सभेसंदर्भातील सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत असून सुरक्षेच्या दृष्टीने हा नियम घालून देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

महत्वाच्या बातम्या