रविवारी होणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांवर भ्रमणध्वनी, गॅझेट वापरास बंदी

मुंबई  : केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून रविवार दि. ३ जून २०१८ रोजी नागरी सेवा (पूर्व) परीक्षा-२०१८ मुंबई शहरात आयोजित करण्यात येत आहे. या परीक्षेदरम्यान परीक्षा उपकेंद्रावर कुठल्याही प्रकारचे भ्रमणध्वनी (मोबाईल), इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, गॅझेट सोबत बाळगण्यास पूर्णत: बंदी असल्याचे मुंबई शहर जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

मुंबई शहरसाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी हे परीक्षेचे मुख्य समन्वयक आहेत. संघ लोकसेवा आयोगाच्या निर्देशानुसार संबंधित उपकेंद्रावर कुठल्याही प्रकारचे मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, गॅझेट सोबत बाळगण्यास पूर्णत: बंदी आहे. पोलीस कर्मचाऱ्यांकडून तपासणी करूनच परीक्षार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येणार आहे.

परीक्षेची वेळ सकाळी ९.३०ते ११.३० वा. आणि दुपारी २.३० ते ४.३० वा. आहे. परीक्षा सुरु होण्याच्या १० मिनिटे अगोदर उपकेंद्रावरील वर्गखोल्यांचे दरवाजे बंद करण्याबाबत आयोगाच्या सूचना आहेत. त्यामुळे उमेदवारांनी ३० मिनिटे अगोदर परीक्षा हॉलमध्ये उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

3 Comments

Click here to post a comment
Loading...