मिरवणुकीत डीजे लावल्यास कारवाई होणारच : नांगरे-पाटील

टीम महाराष्ट्र देशा : सार्वजनिक विसर्जन मिरवणूकीत उच्च ध्वनियंत्रणेला परवागनी देण्याची मागणी (साउंड सिस्टीम) लोकप्रतिनिधीकडून मागणी सुरु आहे. सातारा येथेही काही जणांनी मागणी केली आहे, मात्र त्या ठिकाणी विसर्जन मिरवणूकीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळावर गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

दोन बेस, दोन टॉप आणि मिक्सरलाही परवानगी दिली जाणार नाही. ही सिस्टीम लावण्याचा प्रयत्न केल्यास जागेवरच जप्त करुन मंडळावर तत्काळ गु्न्हे दाखल केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी साउंड सिस्टीम लावण्याची भूमिका जाहीर केली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर काय कारवाई करणार, या प्रश्नावर महानिरीक्षक नांगरे-पाटील म्हणाले, ‘ लोकप्रतिनिधी जनतेच्या भावना मांडण्याचे काम करतात. मात्र पोलिसांना कायद्याचे पालन करावे लागतेच.

You might also like
Comments
Loading...