हायकोर्टाचा दणका, गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवर बंदी कायम

मुंबई – गणेशोत्सवात डीजे आणि डॉल्बीवरील बंदी मुंबई हायकोर्टाने कायम ठेवली आहे. ध्वनीप्रदुषणाच्या मुद्द्यावरुन डीजे व डॉल्बीला परवानगी देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात डॉल्बीचा आवाज नसणार आहे.

मुंबई हायकोर्टात आज याप्रकरणी सुनावणी करण्यात आली. ध्वनी प्रदुषणाच्या मुद्यावरून डीजे साउंड सिस्टिमला सार्वजनिक ठिकाणांवर परवानगी देणे अशक्य असल्याची भूमिका राज्य सरकारने मांडली होती. न्यायालयाने सरकारची ही भूमिका ग्राह्य धरली आहे.ध्वनी प्रदुषणाचे कारण देत न्यायालयाने ही परवानगी नाकारली असून ‘पाला’ या संघटनेस दिलासा देण्यास नकार दिला आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीत डीजे व त्यासारखी कर्णकर्कश आवाज करणारी वाद्ये वाजवणे सुरू करताच त्यांची किमान आवाजमर्यादा ही १०० डेसिबलपर्यंत असते. त्यामुळेच कमालीचे ध्वनी प्रदूषण करणाऱ्या या वाद्यांना गणपती विसर्जनाच्या मिरवणुका व अन्य उत्सवांत परवागी दिली जाऊ शकत नाही, अशी ठाम भूमिका राज्य सरकारच्यावतीने हायकोर्टात मांडण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर हायकोर्टाने शुक्रवारी डीजे व डॉल्बी मालकांना दिलासा देण्यास नकार दिला आहे.

जिल्हा बँकेच्या 21 कोटींच्या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बॅंकेचा नकार