राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्याविरोधात BAMU मध्ये निषेधाचा ठराव मंजूर
औरंगाबाद: राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याविरोधातच आज (७ मार्च) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात निषेधाचा ठराव मंजूर (BAMU approves resolution of protest ) करण्यात आला आहे.
विद्यापीठात आज अधिसभेची बैठक होती. बैठकीला सुरुवात झाल्यानंतर तिन्ही महापुरुषांच्या नावाचा जयघोष करण्यात आला. त्यानंतर निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. त्यानंतर डॉ. संभाजी भोसले आणि अॅड. विजय सुबुकडे यांनी निषेधाचा ठराव मांडला. दरम्यान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले आणि प्र-कुलगुरु डॉ. श्याम शिरसाट यांनी यात भाग घेतला नाही. मात्र सभागृहाने हा ठराव बहुमताने मंजूर केला.
दरम्यान राज्यपाल कोश्यारी यांच्या वक्तव्याचा राज्यभर निषेध व्यक्त करण्यात येत असतानाच आता ‘बामू’ मध्येही निषेधाचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. तर काल (६ मार्च) पुण्यात झालेल्या मेट्रो प्रकल्प उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करत मोदींच्या कानावर ही बाब घातली.
महत्वाच्या बातम्या –