दंगली मागे बामसेफ व संभाजी ब्रिगेडचा हात- शिवप्रतिष्ठान

Sambhaji Brigade and bamcef

मुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचरावरून राज्यात झालेल्या हिंसक घटनेमुळे महाराष्ट्र भर वातावरण बिघडल असून अनेक धार्मिक संघटना एकमेकांवर आरोप करीत आहेत. तसेच या हिंसाचारात नक्षलवादी संघटनांचा हात असण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. सदर हिंसाचारात बामसेफ व संभाजी ब्रिगेड आणि पुण्यातील एल्गार परिषदेच्या निमंत्राकांचा हात असल्याचा गंभीर आरोप श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते चेतन बारस्कर यांनी केला आहे. जातीचे राजकारण संघटनेने केले आम्ही खुले दिलाने चौकशीस सामोरे जाण्यासाठी प्रतिष्ठान तयार आहे. सरकारची तपास यंत्रणा उत्तर देईल, असेही ते म्हणाले.

shivpratishthan pc

जातीयवादी देशविघातक शक्तींना पुन्हा दंगल भडकविण्याची संधी मिळू नये म्हणून ७ जानेवारी रोजी मुंबईतील लालबाग येथे होणारा संभाजी भिडे यांच्या जाहीर व्यख्यानाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत असल्याचे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रवक्ते बलवंत दळवी यांनी सांगितले. मराठा, ब्राम्हण आणि दलित अशी फूट पाडण्याचा प्रयत्न समाजविघतक संघटना करत असल्याचे ते म्हणाले. गुरुजी विरुद्ध खोटी साक्ष देणाऱ्या साळवे यांचा बोलविता धनी कोण आहे. याची सरकारने लवकरात लवकर चौकशी करावी आणि खरे सत्य बाहेर लोकांसमोर मांडावे अशी मागणी संघटनेचे कार्यकर्ते चेतन बारस्कर यांनी केली.

Sambhaji-Bhideदरम्यान भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात माझे नाव नाहक गोवण्यात आले आहे तसेच हातातून सत्ता गेलेल्यांच्या मनात कौरवनिती शिरली आहे त्याच नीतीतून माझ्यावर आरोप करण्यात आले आहेत. या सगळ्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. अगदी यमाच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली तरीही मी चौकशीलाही सामोरे जायला तयार आहे अशी प्रतिक्रिया संभाजी भिडे गुरुजींनी पत्रकारांना आज दिली आहे.