चेंडूसोबत गैरवर्तणूक पडू शकते महागात ! – आयसीसी

डब्लिन : अलीकडच्या काळात क्रिकेटच्या मैदानावर खेळाडू चेंडूशी गैरवर्तणूक करण्याच्या घटनेत वाढ झाल्याचे दिसून आले. या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदनं(आयसीसी) या बाबत नियमात बदल करीत ते आणखीन ताठर करण्याचे निश्चित केले आहे. चेंडूशी गैरवर्तणूक हा प्रकार दर्जा तीनचा (level – 3) गुन्हा ठरवण्यात आला आहे.यानंतर अशा प्रकरणात दोषी आढळणाऱ्या खेळाडूवर १२ एकदिवसीय सामन्यांवर किवा ६ कसोटी सामन्यांकरिता बंदी घालण्यात येऊ शकते.

गेल्या आठवड्यापासून डब्लिन इथं आयसीसीची वार्षिक बैठक सुरु होती. या वार्षिक बैठकीत क्रिकेटच्या आचरसंहिता बदलला मान्यता देण्यात आली. क्रिकेटच्या सामन्यांदरम्यान खेळाडूंशी असभ्य वर्तणूक तसेच चेंडूशी होणारा गैरप्रकार थांबवण्याच्या हेतूनेच आयसीसीने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. यापूर्वीच्या आचारसंहितेत चेंडूशी गैरप्रकार हा दर्जा दोनचा गुन्हा मानला जात होता. आता यापुढे तो दर्जा तीनचा अधिक गंभीर स्वरूपाचा गुन्हा ठरणार आहे.

याच वर्षीच्या मार्च महिन्यात केपटाऊन कसोटीत आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या ऑस्ट्रेलियाचे कॅप्टन स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर व कॅमेरून बँक्रॉफ्ट हे चेंडू छेडछाडच्या प्रकरणात दोषी आढळले होते. त्यामुळे या प्रकरणानं क्रिकेटमधील गैरप्रकारांवर टीकेचा पाऊस मोठ्या प्रमाणावर झाला होता. तेव्हाच चेंडू गैरप्रकार हा गंभीर गुन्हा ठरवावा, अशी मागणी आयसीसीच्या वर्तुळातून होत होती. ती अखेर मान्य झाली आहे.

पावसाळी अधिवेशन मुंबई ऐवजी नागपूराला का ? धनंजय मुंडेंचा सरकारला सवाल

फडणवीसांच्या सहमतीनं हजारो कोटींचा जमिन घोटाळा – काँग्रेस

मोदींनी रेल्वे प्लॅटफॉर्मवर कधी चहा विकलाच नाही?; आरटीआय मधून धक्कादायक माहिती समोर