पिंपरी चिंचवड : नगरसेवक बालाजी कांबळे खून प्रकरणी चौघेजण ताब्यात

आळंदी : आळंदी नगरपरिषदेचे भाजप नगरसेवक बालाजी कांबळे हत्येप्रकरणी चार जणांना दिघी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काल दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली होती. दिघी पोलिसांनी आज चौघांना ताब्यात घेतले आहे.

 काय आहे प्रकरण?

आळंदीतील भाजपचे नगरसेवक बालाजी कांबळे यांच्यावर वडमुखवाडीमध्ये धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला होता. त्यांच्यावर मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास हा हल्ला झाला होता.

बालाजी कांबळे आळंदी नगरपरिषदेचे भाजपचे नगरसेवक होते. ते पहिल्यांदाच नगरसेवकपदी निवडून आले होते. त्यांचा बांधकामाचा छोटेखानी व्यवसाय होता.