बळीराजा संकटात; बोगस बियाणांच्या हजारो तक्रारी

तुळजापूर : तालुक्यातील शेतकऱ्यांनी नामांकित कंपनीचे सोयाबीनचे पेरलले बियाणे न उगवल्या प्रकरणी तालुक्यातील ऐकशे बावीस गावातुन आजपर्यत 1213 बियाणे न उगवल्याचा तक्रारी प्राप्त झाल्या असुन यांचे पंचनामे पुर्ण झाले असुन यातील 450 शेतक-यांचा याद्या बियाणे कंपनीकडे सादर केल्याची माहीती कृषि अधिकारी एन ऐस गायकवाड यांनी दिली.

बियाणे न उगवल्याचा तक्रारी प्राप्त होताच कृषी तक्रार निवारण समिती सदस्यांनी गावात जावुन पाहणी करुन पंचनामे केले. यात 94कंपन्यांचा बियाणांचा समावैश असुन यात सर्वाधिक तक्रारी या महाबीज कंपनीचा आल्या असुन त्याखालोखाल ग्रीन गोल्ड औरंगाबाद 183 त्याखालोखाल कृषिधन बियाणाचा 35 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

अजूनही तक्रारी प्राप्त होत असुन त्या जवळपास सोळाशे पर्यत जाण्याची शक्यता कृषी अधिकारी गायकवाड यांनी वर्तवली आहे.यंदा पावसास वेळेवर सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी विविध खाजगी कंपन्याचे बिबियाणे उसनेपासने व कर्ज काढुन खरेदी करुन काळ्या आईची ओटी भरली. माञ पेरलेले बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी गायकवाड यांच्या कडे धाव घेतली असता त्यांनी रितसर कागदपञासह तक्रार अर्ज करण्यासाठी सांगितले.

यानंतर आजपर्यत तालुक्यातील 122गावातील 1213 शेतक-यांनी तक्रार आर्ज केला असता कृषी तक्रार निवारण समिती सदस्यांनी शेतात जावुन न उगवलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन प्लाँटचे पंचनामे केले यातील 450शेतक-यांचा याद्या कंपनी कडे सादर केल्या असुन उर्वरीत लवकर सादर केल्या जाणार आहेत.या बियाणे कंपन्या या प्रकरणी काय भूमिका याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

छत्रपतींच्या गादीचा अपमान मराठा समाज कदापीही सहन करु शकत नाही.- पूजा मोरे

अजित पवारांचा निर्णयांचा धडाका : ‘सारथी’ला ८ कोटींची मदत जाहीर

संभाजीराजे मराठा युवकांचे पुढारी असतील पण ते मंत्र्यांपेक्षा मोठे नाहीत – गुणरत्न सदावर्ते