बालगंधर्व रंगमंदिर सुवर्ण महोत्सव आरंभ सोहळा

राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातील तमाम कलाकाराचे श्रद्धास्थान असलेले ‘बालगंधर्व रंगमंदिर 50 व्या वर्षात पदार्पण करीत आहे.त्या निमित्त दि. 24 जून 2017 ते 28 जून 2017 या कालावधीत एक विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.                                                              ‘पुणे शहरातील लावणी ,लोकधारा संघ,नाट्यकलावंत,नाट्य निर्माता संघ,रंगभूमी सेवक,मॅप पुणे,ऑर्केस्ट्रा कलाकार संघ,नेपथ्य, रंगमंचीय व्यवस्था,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद,व शाहिरी ,जादूगार,एकपात्री कलाकार ऑल आर्टिस्ट वेलफेअर असोसिएशन,इतर रंगभूमीशी संलग्न आदी सर्व घटक यांनी एकत्रीतरित्या ‘बालगंधर्व परिवार’स्थापन केला असून गेली 10 वर्षे या परीच्या  माध्यमातून कालाक्षेत्रामध्ये सिने-नाट्य लावणी,लोकधारा,ऑर्केस्ट्रा,नेपथ्य,रंगमंच व्यवस्था कलाकार,रंगभूषाकार,वेशभूषा,अभिनय,गायन,वादनातील कलावंतांचा बालगंधर्व परिवार,कालाक्षेत्रीय योगदानाबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.                                                    यंदा बालगंधर्व रंगमंदिराचा सुवर्ण महोत्सवी  वर्ष असून भरगच्च व कार्यक्रमाचे आणि दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.                                                                                   दि 24 जून रोजी दुपारी 2 वाजता भव्य शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.बालगंधर्व रंगमंदिर ते शनिवार वाडा मार्गे बालगंधर्व रंगमंदिर येथे समारोप करण्यात येणार आहे .यामध्ये प्रमुख कलाकार अभिनेता सुबोध भावे,अभिनेत्री मुक्ता बर्वे,अभिनेत्री दीप्ती देवी  व तसेच मराठी चित्रपटातील ‘हृदयानंतर’ व ‘कानिशन अप्लाय’ चित्रपटातील सर्व कलाकार सहभागी होणार आहे.

तसेच दि .25 जून रोजी सकाळी 11 वाजता भव्य महोत्सवाचे उदघाटन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या शुभहस्ते तसेच पालकमंत्री गिरीशजी बापट ,महापौर मुक्तताई टिळक,सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे,खासदार अनिलजी शिरोळे ,खासदार संजय काकडे यांची उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे .                                                                            त्याचबरोबर प्रसिद्ध सिनेनाट्य अभिनेत्री मा. रोहिनी हट्टनगणी यांना पवार साहेबांच्या शुभहस्ते *’जीवनगौरव’*पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे .                                                                             दि 25 जून ते 28 जून या कालावधीत गीत,संगीत,सिनेनाट्य,रंगभूमी,इ. कलेमध्ये योगदान दिलेल्या कलावंताना *’बालगंधर्व परिवार  पुरस्काराने’* गौरविण्यात येणार आहे . अशोक सराफ,निवेदिता सराफ,सचिन पिळगावकर,सुप्रिया पिळगावकर,अलका कुबल,मोहन जोशी,सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर,बानगुडे पाटील,नागराज मंजुळे,व रिंकू राजगुरू अशा लोकप्रिय कलावंतांच्या मुलाखती या सोहळ्यात होणार आहेत.फक्त माहिलांसाठीचा लावणी मैफिल ,संगीत रजनी, व एकपात्री कलाविष्कार ,नाट्य छटा,लोकधारा कार्यक्रम,व्याख्यान अशा प्रकारच्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .या कार्याक्रमादरम्यान विविध क्षेत्रातील योगदान दिलेल्या कलाकारांना सन्मान करण्यात येणार आहे .

    हा सोहळा चंदुकाका सराफ अँड सन्स प्रस्तुत करीत  असून त्यात कोहिनुर ग्रुपचे प्रायोजक असून मांडके डेव्हलपर्स सहप्रायोजक ,तसेच सिद्दीविनायक हेरीटेज ,व कात्रज दूध डेअरी संघ यांचे प्रायोजकत्व लाभले आहे.                                        त्याचा तपशील व संपूर्ण महोत्सवाची कार्यक्रम पत्रिका सोबत जोडण्यात आली आहे.                                             कलाकाराचे आणि पत्रकारांचे जिव्हाळ्याचे नाते आहे.पत्रकारांचे या बालगंधर्व रंगमंदिरामध्ये मोलाचे योगदान आहे. त्यांच्या सहकार्याच्या भावनेतून आपण पत्रकार बंधू-भगिनींना या महोत्सवाच्या प्रत्येक कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढवावी व बालगंधर्व रंगमंदिराचा सुवर्ण महोत्सव आपल्या लेखणीद्वारे अजरामर,अविस्मरणीय करावा हि माफक अपेक्षा बालगंधर्व रंगमंदिराचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी केली आहे.
 तमाम पुणेकरांसाठी  प्रवेश विनामूल्य असून सदर कार्यक्रमास उपस्थित राहून शोभा वाढवावी हि विनंती.