पुढील वर्षी या इयत्तांचा अभ्यासक्रम बदलणार

पुणे-  मागील वर्षी इयत्ता सातवी व नववी, यंदा इयत्ता पहिली, आठवी व दहावीचा अभ्यासक्रम बदलल्यानंतर आता पुढील वर्षी इयत्ता दुसरी, तिसरी व अकरावीचा अभ्यासक्रम बदलणार असल्याचे समोर आले आहे. इयत्ता पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम ठरविण्यासाठी एकच अभ्यास मंडळ तयार करण्यात आले असून या मंडळामार्फत हे अभ्यासक्रम बदलण्यात येत आहेत.

राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती केंद्राकडून पाठ्यपुस्तक विक्रेत्यांना पत्र लिहून जुनी पुस्तके बदण्याची विनंती करण्यात आली आहे. यामध्ये बालभारतीचे संचालक सुनील मगर यांनी नमूद केल्याप्रमाणे या शैक्षणिक वर्षात (2018-19) इयत्ता आठवी व दहावीची पुस्तके बदण्यात येणार आहेत; तर इयत्ता दुसरी, तिसरी व अकरावीच्या पुस्तकांसाठी 2018-19 हे शेवटचे वर्ष असेल. पुढील वर्षी याही इयत्तांची नवी पुस्तके बाजारात येतील. त्यामुळे जुना स्टॉक बालभारतीकडे जमा करण्याच्या सूचनाही वितरक व दुकानदारांना करण्यात आल्या आहेत.