मुंबई : शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर आनंद दिघे मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपट नुकतंच प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरच हा सिनेमा प्रदर्शित झाल्याने, त्याचं प्रमोशन जोरावर आहे. एकीकडे हे सर्व सुरु असताना, निलेश राणे` यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा राज्याचा मुख्यमंत्री आहे. दिघेंचे शिष्य एकनाथ शिंदे राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत. शिंदेंचे चिरंजीव खासदार आहेत. पण या सत्तेच्या सारीपाटात दिघे कुटुंबीय कुठे आहेत? असा सवाल माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. निलेश राणे यांनी शिवसेनेचं दुखरी नस दाबल्याने, नीलेश राणे यांचं ट्विट चर्चेत आहे.
बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री,
"शिष्य" एकनाथ शिंदें कॅबिनेट मंत्री, मुलगा खासदार, स्व. आनंद दिघे साहेबांच्या घरात साधा नगरसेवक, शाखाप्रमुख नाही पण निवडणूक आली की दिघे साहेब. आज दिघे साहेबांवर आधारित धर्मवीर नावाचा चित्रपट रिलीज झाला पण त्यांच्या कुटुंबाचे कुठेच नाव नाही.— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) May 13, 2022
धर्मवीर सिनेमाच्या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी शिवसेनेला डिवचल्याने आता शिवसेनेकडून काय प्रत्युत्तर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान शिवसेना कार्यकारी अध्यक्ष उध्दव ठाकरे यांची आज तोफ मुंबईत बीकेसी मैदानावर तोफ धडाडणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :