‘बाळासाहेबांची शिवसेना वेगळी आणि उद्धव ठाकरेंची वेगळी’

ajit pawar, shivsena and udhabv thakrey

पुणे: बाळासाहेबांची शिवसेना वेगळी होती, आणि उद्धव ठाकरेंची वेगळी आहे. असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. ते पुण्यात पत्रकारांसोबत बोलत होते.

मला बाळासाहेबांचे कार्टून आवडायचे आणि आज मार्मिकपणे राज ठाकरेंनी काढलेली कार्टूनही आवडतात. असेही पवार म्हणाले.

अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत मुख्यमंत्री, आदित्य ठाकरेंना हि बाहेर बसवलं गेल; त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली हे त्यांनाच माहित आहे. मी आजही सांगतो शिवसेना-भाजप एकत्रच निवडणूक लढवणार. असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.