बाळासाहेब म्हणायचे, शब्द बंदुकीच्या गोळीप्रमाणे असतात; राणेंनी उद्धव ठाकरेंना करून दिली ‘ही’ आठवण 

nitesh balasaheb and uddhav

मुंबई : राज्यात सद्या संकटांची मालिका सुरु आहे. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वतः प्रत्यक्ष मैदानात उतरून जनतेचं दुःख समजून मदत करावी अशी मागणी करत विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

भाजपने मंदिरं खुली करण्यावरून आधीच सरकारवर हल्लाबोल सुरु केला होता. आता अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या गंभीर नुकसानावरून त्वरित भरपाई देण्यासाठी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं जात आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी या दोन्ही मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंच्या जुन्या विधानांवरून दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करून देत टोला लगावला आहे.

त्यांनी दोन वृत्तांचे फोटो आपल्या ट्विटला जोडले आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांवेळी शिवसेनेने शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिवर्षी १० हजार रुपये जमा करणार असं आश्वासन देण्यात आलं होतं. तर, राम मंदिराच्या मुद्द्यावरून ‘पहिले मंदिर, मग सरकार’ असा नारा उद्धव ठाकरेंनी दिला होता. मात्र सद्या कोरोनाच्या सावटामुळे मंदिरं अजूनही बंद आहेत तर शेतकरी देखील संकटात सापडला आहे. त्यामुळे नितेश राणे यांनी, ‘शब्द हे बंदुकीच्या गोळीप्रमाणे असतात, एकदा तोंडून गेले की ते मागे घेता येत नाहीत’ या बाळासाहेबांच्या वाक्याची आठवण करून देत या मुद्द्यांवर लक्ष वेधले आहे.

महत्वाच्या बातम्या-