वीजबिलाच्या मुद्द्यावरून कॉंग्रेसमध्ये मतभेद? थोरातांनी केली नितीन राऊत यांची पाठराखण

ashok chavhan

मुंबई : टाळेबंदीच्या काळात सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना सरकारने पाठवलेल्या भरमसाठ वीजबिलामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.राजकीय पटलावर देखील सध्या वाढीव वीजबिलांचा मुद्दा चांगलाच गाजतोय.

अशातच एक धक्कादायक खुलासा कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबिलात सवलत देण्याची घोषणा करताना घाई केली. त्यांनी पक्षात आणि सरकारमध्ये घोषणा करण्याआधी चर्चा करायला हवी होती. प्रक्रिया फोलो करणे आवश्यक होते. तसे झाले नाही, ही आमच्याकडून चूक झाली, अशी कबुली मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

दरम्यान, आता याच मुद्द्यावरून कॉंग्रेसमधील नेते आमनेसामने आले आहेत. राऊत यांनी घाई केली असे चव्हाण सांगत असताना प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे नितीन राऊत यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याचे चित्र आहे. नितीन राऊत यांनी वीज बिलात सवलत देण्याची घोषणा ही मंत्रिमंडळ सहकारी समवेत चर्चा करूनच केली होती, असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे.

वीजबिल संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर मंत्रिमंडळातील सहकारी चर्चा करूनच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घोषणा केली होती. याबाबत कदाचित अशोक चव्हाण यांना माहिती नसावी, असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या